शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (13:27 IST)

Coronavirus Return in china : चीनमध्ये पुन्हा वाढला कोरोना; लेन्झोऊमध्ये लॉकडाऊन लागू, चार लाख लोक घरात कैद

चीनच्या विविध शहरांमध्ये पुन्हा कोराना वाढू लागला आहे. लेन्झोऊमध्ये लॉकडाऊन करण्यापूर्वी, चीनच्या उत्तर आणि वायव्य प्रांतातील अनेक शहरांनी शाळा बंद करणे आणि उड्डाणे निलंबित करणे सुरू केले आहे
 
चीनमध्ये कोरोना पुन्हा एकदा पाय पसरत आहे. वेगवेगळ्या शहरात रोज नवीन कोरोना बाधित रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, चीनने आपल्या लेन्झाऊ शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.
 
चीनच्या अनेक भागात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. शनिवारी राजधानी बीजिंगमध्ये कोरोना विषाणूचे 9 नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी  तपासणी आणि हॉटेलची बुकिंग थांबवली आहे.
 
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या मते, देशाच्या विविध भागांमध्ये कोविड -19 चे 38 रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राजधानी बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाचे 9 नवीन रुग्ण आढळले. संक्रमित आढळलेले पाच लोक 12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेश, निंग्जिया हुई स्वायत्त प्रदेश आणि शांक्सी प्रांतात गेले होते. हे लोक 16 ऑक्टोबर रोजी बीजिंगला परतले. अर्बन हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, संक्रमित आढळलेली दुसरी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली.
 
याशिवाय शुक्रवारी देशात संसर्गाची 32 प्रकरणे समोर आली आहेत. संसर्गाची प्रकरणे वाढण्यामागे शांघायमध्ये राहणारे एक वृद्ध जोडपे आहे, या जोडप्यानं शियानसह अनेक शहरांमध्ये जाऊन कोरोनाचा संसर्ग पसरवला. यानंतर अधिकाऱ्यांनी या जोडप्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तीन दिवसात, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेले शेकडो लोक शोधले गेले, कोरोनाची चाचणी झाली आणि त्याच्याबरोबर प्रवास करणारे पाच लोक नंतर संक्रमित असल्याचे आढळले
 
हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, या काळात अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली आणि ज्या भागात संक्रमित लोक गेले होते ते भाग सील करण्यात आले.