शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:03 IST)

मॅक्सिकोत भूकंप, 119 ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात आतापर्यंत 119 जण ठार झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.
 
अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे. ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे.
 
विशेष म्हणजे मॅक्सिकोमध्ये 1985मध्ये झालेल्या भूकंपाच्या 32 वर्षांनंतर त्याच दिवशी मॅक्सिको सिटी पुन्हा एकदा विध्वंसक भूकंपानं हादरली आहे. 1985 साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.