Widgets Magazine
Widgets Magazine

रशियामध्ये त्सुनामी येण्याची भीती, अलर्ट जारी

मंगळवार, 18 जुलै 2017 (12:48 IST)

रशियामधील कमचटका पेनिसुला येथे शक्तिशाली भूकंप झाला आहे. आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू बर्निंग आयलँडपासून 200 किलोमीटर लांब असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीती असून तसा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मंगळवारी सकाळी 11 वाजून 34 मिनिटांनी  निकोल्सकोय शहरापासून जवळपास 200 किमी दूर अंतरावर असलेल्या कमचटका पेनिसुला आयर्लॅडवर भूकंप आला होता. भूकंपाची व्याप्ती खूप कमी होती. हा भूकंप प्रचंड धोकादायक होता. मात्र भूकंप शहरापासून लांब झाला, तसंच याठिकाणी कोणतीही मानवी वस्ती नाही आहे. यामुळेच सुदैवाने कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याची माहिती मिळाली आहे.
 
भूकंपाचा धोका टळला असला तरी त्सुनामी येण्याची शक्यता आहे. तसा अलर्टच जारी करण्यात आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात आत असल्याने त्यामुळे निकोल्सकोय किनाऱ्यावर 1-2 फुटाच्या लाटा निर्माण होतील, असं सांगण्यात येत आहे. रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने, उंच लाटा येण्याची भीती व्यक्त केली असून या निकोल्सकोयमध्ये पोहोचू शकतात असं सांगितलं आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भारताला जी २० परिषदेचे यजमान पद नाही

भारतात 2019 साली होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक आणि मेगा सेंटरचा अभाव यामुळे 2019 च्या ...

news

पुणे : रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा ...

news

ऑस्कर पारितोषिक विजेते हॉलीवुड अभिनेते मार्टिन लॅंडो यांचे निधन

ऑस्कर पारितोषिक विजेते हॉलीवुड अभिनेते मार्टिन लॅंडो यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन ...

news

उपराष्ट्रपतिपदची निवडणूक : एनडीएकडून व्यंकय्या नायडू उमेदवार

भाजपाने केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार ...

Widgets Magazine