शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :जकार्ता , शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (10:51 IST)

इंडोनेशियात तीव्र भूकंप, 7 ठार, शेकडो जखमी

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार सर्वाधिक नुकसान इंडोनेशियाच्या सुलावेसी शहरात झाले आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार मृतांची संख्या वाढू शकते.
 
भूकंपाचे केंद्रबिंदू माजेणे शहराच्या ईशान्य दिशेस 6 किमी अंतरावर नोंदवले जात आहे. रात्री एक वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत 60 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. असे म्हटले जात आहे की सुमारे 7 सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. यापूर्वी गुरुवारी देशाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.