बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: ब्रूसेल्स , बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:33 IST)

युरोपच्या बाजारात अंड्यांमध्ये आढळले कीटकनाशक

युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झाला आहे. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या.
नेदरलॅंडच्या कोंबडी मालक संघटना एलटीओ यांनी याविषयी माहिती दिली. बेल्जियमने प्रकरणी स्पष्टीकरण दिले पाहिजे. दरम्यान, जर्मनी, नेदरलॅंड, बेल्जियम, स्वीडन आणि स्वित्झर्लंडमधील सुपर बाजारात लाखोंच्या संख्येने अंड्यामध्ये फिप्रोनिल रसायन असल्याच्या कारणाने हटवण्यात आली आहेत. अंड्यात सापडलेल्या या घातक रसायन अंशामुळे मनुष्याचे मूत्रपिंड, यकृत आणि थायरॉईड ग्रंथी याला धोका पोहोचू शकतो. नेदरलॅंडच्या कृषी संघटना एलटीओने सांगितले, १५० कंपनियांनी आतापर्यंत ३  लाख कोंबड्यांना मारले आहे. आणखी लाखभर कोंबड्या मारण्यात येणार आहेत. अंड्यामध्ये रासायनिक अंश सापडल्याची माहिती रात्री मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
 
दरम्यान, बेल्जिअमचे कृषी मंत्री डेनिस डुकार्मे यांनी याबाबत अन्न सुरत्रा एजन्सीकडून अहवाल मागविला आहे. अंड्यामध्ये फिप्रोनिल रसायन असल्याची माहिती जूनपासून मिळाली असताना शेजारी देशांना का माहिती देण्यात आलेली नाही, असे म्हटले. जर्मनी आणि नेदरलॅंड याचा परिणाम सहन करावा लागत आहे. अंड्यात किटकनाशक सापडल्याची माहिती न सांगितल्याबद्दल बेल्जियमकडून जर्मनी आणि नेदरलॅंडने स्पष्टकरण मागितले आहे.