Widgets Magazine
Widgets Magazine

अमेरिकेत मंगळवारीच का होते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक?

सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (14:35 IST)

election america

अमेरिकेत 150 हून अधिक वर्षांपासून मंगळवारीच निवडणूक होते. अमेरिकेत दर 4 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होते. 1845 मध्ये अमेरिकी काँग्रेसने निर्णय घेतला होता की, प्रत्येक वेळेस नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी निवडणूक होईल. याबाबत यूएस काँग्रेसने एक प्रस्ताव पास केला होता आणि तेव्हापासून मंगळवारीच निवडणूक होत आहे. यामागे कोणतंही धार्मिक कारण नाही. तर शेतकर्‍यांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. 
 
अमेरिका तेव्हा एक कृषिप्रधान देश होता. त्यामुळे निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिना शेतकर्‍यांना लक्षात ठेवून घेण्यात आला. उन्हाळ्यात‍ किंवा थंडीच्या दिवसांमध्ये शेती केल्यास नुकसान होऊ शकतं. मंगळवारचा दिवस यासाठक्ष की लांबून येणार्‍या मतदारांचा रविवारचा दिवस व्यर्थ जाऊ नये. त्यांना चर्चमध्ये जाता यावं. त्यावेळेस अमेरिकेची अधिक लोकसंख्या ही शेतीकामांशी जोडलेली होती. मतदान करण्यासाठी येतांना ते लांबचा प्रवास घोड्याने करायचे. त्यावेळेस त्याचा तो प्रवास एक दिवसापेक्षा अधिकचा असायचा. अमेरिकेत त्यावेळेस शेतकरी शनिवायपर्यंत शेतात काम करायचे. रविवारी ते आराम करायचे आणि चर्चमध्ये जायचे. त्यामुळे त्या दिवशी मतदान ठवेल्यास कमी मतदान होण्याची शक्यता असायची. त्यामुळे जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिला सोमवारच्या दुसर्‍या दिवशी निवडणूक घेतली जाते. 
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मायावतींविरुद्ध निवडणूक लढणार राखी सावंत

नवी दिल्ली- सतत वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत आता उत्तरप्रदेश विधानसभेची ...

news

ट्रम्प घेणार वर्षाला फक्त १ डॉलर वेतन

अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार ...

news

जुन्या नोटा वापरण्याला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत सोमवारी मध्यरात्री संपणार होती. पण ...

news

रद्दीत विकायला निघाले 500 रूपयांच्या नोटा, काय झाले (पहा व्हिडिओ)

500 आणि 1000 रुपयांचे नोटा बंद झाल्यापासून सुट्टे पेश्यांची विचारपूस वाढली आहे. लोकं ...

Widgets Magazine