सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

महिलेने घरावर काढवल्या इमोजी, शेजारीण म्हणाली- मला चिडवण्यासाठी असे केले

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिलेने आपल्या शेजारच्यांना आनंदी ठेवण्यासाठी घराच्या भिंतीवर इमोजी पें‍ट करवल्या परंतू आता यामुळे वाद निर्माण होत आहे.
 
कॅथरीन कीड नामक महिलेचे म्हणणे आहे की ताण असला तरी त्यांचे शेजारच्यांनी आनंदी राहावं म्हणून त्यांनी घर त्याप्रमाणे पेंट करवले. माझे शेजार-पाजरचे नेहमी थकलेले आणि दुखी दिसतात आणि दुसर्‍यांच्या प्रकरणात नाक खुपसतात म्हणून मी भिंतीवर अशा इमोजी पेंट करवल्या ज्याने ते बघून खूश होतील तरी ते लोकं खूश नाहीत, असे त्या महिलेने सांगितले.
 
कॅथरीनच्या शेजारी राहणार्‍या महिलेने सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांचं आपसात भांडण झालं होतं आणि त्यांनी चिडवण्यासाठी घराच्या भिंतीवर अशा प्रकाराच्या इमोजी रंगवल्या आहे. यात एकात तोंडावर ताबा ठेवण्याचा तर दुसर्‍यात थट्टा दर्शवणारा इशारा आहे. हे नकारात्मक आहे.
 
त्यांनी म्हटले की जेव्हा पासून कँथरीनच्या भिंतीवर असे इमोजी बघितले आहे तेव्हापासून मी घरातील पडदे हटवले नाही कारण मला हे बघायला मुळीच आवडत नाही.