Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

शरीरभर तीळ असलेली सौंदर्यवती

Evita Delmundo
जकार्ता- मलेशियातील एका तरूणीला लहानपणापासूनच चेहर्‍यापासून पायापर्यंत अनेक चामखीळ, तीळ आहेत. वीस वर्षाच्या या इविता देलमुंदो नावाच्या तरूणीला अनेक वेळा लोकांनी चेष्टेचा विषय बनवले होते. काही लोक तर तिला राक्षसीणही म्हणत असत. मात्र, तिने या चामखिळांमध्येच आपले सौंदर्य शोधले आहे. इतकेच नव्हे तर ती सध्या मिस मलेशिया सौंदर्य स्पर्धेतही सहभागी झाली आहे.
इविताने सांगितले की तिच्या अशा रूपामुळे शाळेत कुणी तिच्याशी बोलणेही पसतं करीत नसे. त्यामुळे तिला एकही मित्र किंवा मैत्रीण नव्हती. उलट अनेक वेळा तिला कुचेष्टेचा सामना करावा लागत असे. इविताला कसेही करून या चामखिळांपासून स्वत:ची सुटका करवून घ्यायची होती. मात्र त्यासाठी शस्त्रक्रियेचा मार्ग तिने नाकारला. शेवटी काळाच्या ओघात तिने आपल्या नैसर्गिक रंगरूपाशी जुळवून घेण्यास आणि त्यावर प्रेम करण्यास सुरूवात केली.

आता ती इन्सटाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर करीत असते. लोकांच्या वाईट प्रतिक्रियांकडे सहज दुर्लक्ष करण्याची कलाही तिला जीवनाने शिकवली आहे.


यावर अधिक वाचा :