शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (17:09 IST)

पाकिस्ताकडून गोळीबार, एक जवान शहीद

ईदच्या दिवशीही जम्मू-कश्मीरमधील वातावरण तणावाचे आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी जवानांनी हिंदुस्थानी चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारामध्ये हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला. शहीद जवानाचे नाव विकास गुरुंग असे आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकड्यांचा गोळीबार सुरू असताना जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्येही ईदच्या दिवशी अशांततेचे वातावरण राहिले. ईदच्या नमाजनंतर जमावाने हिंदुस्थानी लष्करातील जवानांवर तुफान दगडफेक केली. अनंतनागमध्ये जवानांवर दगडफेकीवेळी जमावाने इसिस आणि पाकिस्तानी झेंडे फडकवले. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
 
पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून त्याचा परिणाम ईदच्या उत्सवावरही दिसून आला. ईदच्या दिवशी अटारी-वाघा सीमेवर बीएसएफ जवान आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान दरवर्षी मिठाईची देवाणघेवाण होत असते. पाकिस्तानकडून होत असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर मिठाईची देवाणघेवाण झाली नाही.