testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कशी आहे फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप?

Last Modified बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (11:11 IST)
रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रंप यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आता चर्चा सुरू आहे ती फर्स्ट लेडी ‍म मेलिनिया ट्रंप हिच्याबाबत.

मेलिनिया अनेक बाबतीत पूर्वीच्या फर्स्ट लेडीपेक्षा वेगळी आहे. एकतर ती सुंदर आहेच पण ती माजी मॉडेलही आहे आणि तिच्या मासिकावर प्रसिद्ध झालेल्या न्यूड फोटोमुळे ती नागरिकांत विशेष लोकप्रिय नाही. जॉकलीन केनेडीनंतर मेलिनिया सर्वात सुंदर फर्स्टलेडी बनली आहे.

ती पती डोनाल्डपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे आणि डोनाल्ड यांची ही तिसरी पत्नी आहे. ती जन्माने अमेरिकन नाही तर स्लोव्हाकियाची आहे.

गेल्या दोन दशकात परदेशात जन्मलेली ती पहिली फर्स्ट लेडी आहे. यापूर्वी लुईसा अॅडम्स ही इंग्लंडमध्ये जन्मलेली अमेरिकेची फर्स्ट लेडी होती. मेलिनिया बहुभाषिक आहे म्हणजे तिला चार भाषा अवगत आहेत आणि पॅट निक्सन व बेटी फोर्ड नंतर मॉडेलिंग क्षेत्र गाजविलेली ती तिसरी फर्स्टलेडी आहे.

अर्थात गेले वर्षभर मेलिनिया व्हाईट हाऊससाठी तयार होत होती व त्याचे प्रतिबिंब तिच्या ड्रेसमधून सर्वप्रथम दिसले होते.

मेलिनिया अमेरिकन नागरिकांत फारशी लोकप्रिय नसल्याने तिला निवडणूक प्रचारादरम्यान स्पॉटलाइटपासून दूर ठेवले गेले होते असेही सांगितले जाते. अर्थात या मागे तिची ग्लॅमरस प्रतिमा होती तसेच प्रत्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याऐवजी तीच मतदारांचे आकर्षण बनू नये हाही हेतू होता असे समजते.


यावर अधिक वाचा :