मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 मार्च 2022 (15:26 IST)

श्रीलंकेत इंधनाचे संकट गडद ;पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा

श्रीलंकेत इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन वितरणाचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी मंगळवारी पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करावे लागते, अशी परिस्थिती आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात मोठे आर्थिक आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.
 
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अचानक वाढल्याने आणि इंधनाचा तुटवडा यामुळे हजारो लोकांना तासनतास पेट्रोल पंपावर उभे राहावे लागत आहे. लोकांनाही दररोज अनेक तास वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे.
 
"कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपांवर लष्करी कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे कारण लोक व्यवसाय करण्यासाठी कॅनमध्ये इंधन घेऊन जात आहेत."
 
इंधनासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांमधून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. परकीय चलनाच्या संकटामुळे इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात ठप्प झाली आहे. श्रीलंका सरकारने भारताकडे कर्जाची मदत मागितली होती, त्यानंतर भारताने गेल्या आठवड्यात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले.