गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सिंगापूर , शुक्रवार, 21 जुलै 2017 (12:32 IST)

लग्नानंतर पतीने लिंगबदल केल्यामुळे लग्न रद्द

लग्नानंतर पतीने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे सिंगापूरमध्ये एका जोडप्याचे लग्नच रद्द करण्यात आले. लिंगबदल केल्यानंतर पती-पत्नी या दोघांचेही लिंग एकच झाले असून सिंगापूरमधील कायद्यानुसार समलैंगिक विवाहाला मान्यता नाही. त्यामुळे या लग्नाला परवानगी देता येत नाही, असे सरकारने म्हटले आहे.
 
या जोडप्याचे लग्न 2015 साली झाले होते. त्यानंतर पतीने लिंगबदल करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. त्याने आपल्या राष्ट्रीय ओळखपत्रातही स्त्री म्हणून स्वतःची ओळख नोंद करून घेतली होती. मात्र सरकारच्या घरबांधणी योजनेत त्यांनी नाव नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
 
सिंगापूरमध्ये विवाहीत जोडप्यांना घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. त्यावेळी कागदपत्रे तपासताना या लिंगबदलाचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांचे लग्न तर रद्द झालेच, पण त्यांच्या घर विकत घेण्याची योजनाही बारगळली.