मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:49 IST)

हृदयद्रावक ! लग्नाच्या 18 तासांनंतर नवरीचा मृत्यू

सध्या एका जोडप्याची प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अनोखी प्रेम कहाणी आणि ही घटना 22 डिसेंबर 2017 ची आहे. या प्रेम कहाणीत एका आजारी महिलेने तिच्या प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा दाखवली. त्यांचे लग्न झाले. मात्र 18 तासानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. महिला ब्रेस्ट कॅंसर ने झपाटलेली होती तिने आपल्या प्रियकराशी बेडवर लग्न केले आणि 18 तासांनी तिचा मृत्यू झाला. हिदर मोशर असे या महिलेचे नाव असून हे प्रकरण आहे अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील.  

22 डिसेंबर 2017 रोजी, ऑक्सिजन मास्क घातलेल्या हीदर मोशरने हार्टफोर्ड हॉस्पिटलमधील हॉस्पिटलच्या बेडवर वेडिंग गाऊन मध्ये डेव्हिडशी लग्न केले. पण लग्नाच्या 18 तासांनंतर दुसऱ्याच दिवशी 31 वर्षीय हीदरचा मृत्यू झाला.या दोघांची भेट एका स्विंग डान्सिंग क्लास मध्ये 2015 मध्ये झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. डेव्हिड हीदरला 23 डिसेंबर 2016 रोजी प्रपोज करणार होता पण हीदरला कॅंसर असल्याचे समजले तरीही डेव्हिड ने तिला प्रपोज केले. हिदरने मरण्यापूर्वी डेव्हिडशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिने बेडवर वेडिंग गाऊन घालून डेव्हिडशी लग्न केलं.आणि 18 तासानंतर 31 वर्षाच्या महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला. 
ही अनोखी प्रेम कहाणी एका युजर्स ने 29 जानेवारी रोजी X वर शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्या पासून आता पर्यंत 90 लाख लोकांनी बघितली आहे तर 76 हजाराहून अधिक या पोस्टला लाईक्स मिळाले आहे. तर हजाराहून अधिक लोकांनी यावर कॉमेंट्स केले आहे. 
 
  Edited by - Priya Dixit