1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 (16:28 IST)

अमेरिका निवडणूक प्रथम फेरीत हिलरी आघाडीवर

हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत  पहिल्या विजयाची नोंद केली. यामध्ये हिलरी यांनी न्यू हॅम्पशायर प्रांतातील डिक्सविले नॉच या गावामध्ये झालेल्या मतदानात हिलरी यांना विजयी घोषित केला आहे. यावेळी हिलरी क्लिंटन यांना चार मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना दोन, लिबरेशन उमेदवार गॅरी जॉन्सन यांना अवघे एक मत मिळाले आहे. 
 
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्री डिक्सविले नॉचमध्ये सर्वात पहिले मतदान होते. यामध्ये बुधवारी पूर्ण अमेरिकेतील असलेले मतदान मोजणी पूर्ण होणार असून एक उमेदवार विजेता घोषित होणार आहे. जर हिलरी निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष असणार आहेत.