गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (10:47 IST)

ब्रिटनमध्ये भारतीय वृद्धाला अल्पवयीन मुलांनी केली मारहाण

pitai
ब्रिटनमधील लीसेस्टरशायरमधील ब्राउनस्टोन टाउनमधील फ्रँकलिन पार्कमध्ये कुत्र्यांना घेऊन फिरायला गेलेल्या 80 वर्षीय भीम सेन कोहली यांच्यावर 5 मुलांच्या गटाने हल्ला केला, परिणामी त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 
  
मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनी सांगितले की, हल्लेखोर मुलांनी वृद्धाच्या मानेवर लाथ मारली आणि त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्यांच्या मृत्यू झाला. लेस्टरशायर पोलिसांनी एक मुलगा आणि एक मुलगी, एक 12 वर्षांचा मुलगा आणि दोन मुलींना संशयावरून ताब्यात घेतले, 14 वर्षांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे, इतर चार जणांना पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिले आहे असे सांगण्यात आले आहे व तपास सुरू केला.

Edited By- Dhanashri Naik