शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 17 जुलै 2019 (10:22 IST)

कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय देणार निकाल

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) आज (17 जुलै) निकाल देणार आहे.  
 
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांर्तगत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मे 2017 मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. आता न्यायालय आज आपला निकाल देणार आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या प्रकरणात पाकिस्तानने, हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च 2016 मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला आहे.