पाकिस्तानात महागाई भडकली, सफरचंद 400 रुपये किलो तर संत्री 360 रुपये डझन

कराची- पाकिस्तानची खराब स्थिती आता येथील लोकांवर भारी पडतेय. आर्थिक रूपाने कमजोर पाकिस्तानची स्थिती अजून वाईट होत चालली आहे. इम्रान सरकाराला महागाई मात करण्यात अपयश आले आहे.
खाण्या-पिण्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. रमजानमध्ये फळांची मागणी असल्यामुळे आता सफरचंद 400 रुपये किलो, संत्री 360 रुपये आणि केळी 150 रुपये डझन या भावाने विकले जात आहे. बातम्यांप्रमाणे शहरातील अनेक लोक महागाई विरोधात प्रदर्शन करत आहे.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाच्या भावात निरंतर घट झाल्यामुळे हे दक्षिण आशियाच्या प्रमुख चलन तुलनेत सर्वात कमजोर स्थितीत पोहचले आहे. ब्‍लूमबर्ग रिपोर्टनुसार पाकिस्तानी मुद्रा आशियाच्या 13 इतर चलनांमध्ये सर्वात वाईट प्रदर्शन करणारी करेंसी आहे. यात सुमारे 20 टक्क्यांपर्यंत घट झालेली दिसून येत आहे.
खाण्या पिण्याच्या वस्तू महाग झाल्या
पाकिस्तानमध्ये एक डझन संत्री 360 रुपये तर लिंबू आणि सफरचंद यांच्या किमती 400 रुपये किलो पर्यंत पोहचल्या आहेत. पाकच्या लोकांना 150 रुपये डझन केळी, मटण 1100 रुपये किलो, चिकन 320 रुपये किलो आणि एक लीटर दुधासाठी 120 ते 180 रुपये पर्यंत खर्च करावे लागताय. महागाईमुळे आक्रोशीत लोकं सोशल मीडियावर आपला राग काढत आहे.

हे पाऊल उचलत आहे इम्रान सरकार
घसरत असलेली अर्थव्यवस्था बघत पाकिस्तान सेंट्रल बँक एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. सेंट्रल बँक व्याज दरावर मोठी घोषणा करत रुपया सांभाळण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकते. एक समिती गठित करण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे.

इम्रान सरकार पर्यटनासाठी परदेशात जात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मर्यादित डॉलर देण्याचा निर्णय घेऊ शकते. ही रक्कम 10,000 डॉलरहून घसरून 3,000 डॉलर करण्यात येऊ शकते. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या खजिन्यातून एका वर्षात 2 अब्ज डॉलरहून अधिक वाचू शकतील.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या ...

एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता होणार नाही

एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता होणार नाही
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा एमआयएमबरोबर यापुढे कधीच ...

“सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले की ...

“सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले की नाही वाचा खुलासा
लशीच्या ट्रेडमार्कबाबत “सिरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया’ (सिरम) ने जून 2020 मध्येच अर्ज केला ...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोप भाषणात ...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोप भाषणात म्हटले आहे - ही माझ्या चळवळीची केवळ सुरुवात आहे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या काही दिवसांमध्ये ...

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही

कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला दिली जाणार नाही
बेळगावातील हुतात्मा दिनाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा भागासंदर्भात ...