शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (12:48 IST)

चीनमध्ये 'अलीबाबा'सारखा मुलगा चर्चेत

चीनच्या पूर्वी भागात राहणारा आठ वर्षाचा एक मुलगा सध्या फार चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा मुलगा त्या व्यक्तीसारखा दिसतो जो चीनच्या सर्वात धनी व्यक्तींमधून ऐक आहे. आठ वर्षाच्या या मुलाचे नाव फू श्या किन आहे आणि त्याचा चेहरा चीनच्या सर्वात रईस लोकांमधून एक जैक मा सारखा आहे. 
 
जैक मा तोच आहे ज्याने ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाला उभे केले आहे. चीनमध्ये सोशल मीडिया वर अफवांचा बाजार गरम आहे की जैक मा यांनी फू श्या किनच्या अभ्यासाची जबाबदारी उचलली आहे. या बाबत अलीबाबा कंपनीकडून एका विधानात म्हटले गेले आहे की, ''मिनी जैक माच्या बद्दल सर्व वृत्तांना विनोद(जोक)म्हणून घ्यायला पाहिजे...एका मुलाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणे सोपे आहे पण लाखो गरीब मुलांच्या मदतीसाठी बरेच संसाधनांची गरज पडते.'' फू श्या किनचा कुटुंब जियांग्शी प्रांतात राहत असून फारच गरिबीत दिवस काढत आहे.  
 
फू श्या किनच्या वडिलांचा एक पाय एंप्यूटेट झाले आहे आणि तो सरकारकडून मिळणार्‍या मदतींवर निर्भर आहे. याची आई पोलियोग्रस्त आहे.
 
जैक मा सारखा दिसल्यामुळे चर्चेत आल्यानंतर फू श्या किनला चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करण्याचे ऑफर आले आहे.  
 
फू श्या किनचे वडील फू जियाफाचे म्हणणे आहे की, ''ही चांगली बाब आहे की माझा मुलगा जैक मा सारखा दिसतो. पण माझी इच्छा नाही आहे की त्याने आतापासून चित्रपटांमध्ये काम केले पाहिजे आणि पैसा कमावायला पाहिजे. माझे असे मानणे आहे की शिक्षाच त्याचे जीवन सुधारू शकते.''