Kabul blast काबुल स्फोटात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शियाबहुल भागात शुक्रवारी पहाटे बॉम्बस्फोट झाला.या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत.तालिबान-नियुक्त प्रवक्ता खालिद झदरन यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी दश्ती बर्ची परिसरात हा स्फोट झाला.या क्षेत्रात जास्तकरून अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शिया समुदायाचे लोकं राहतात. या स्फोटाची जबाबदारी सध्या कोणीही स्वीकारलेली नाही.
वृत्तानुसार, एका आत्मघाती हल्लेखोराने दश्ती बर्ची भागातील एका शिक्षण केंद्रात स्वत:ला उडवले.मृत आणि जखमींमध्ये बहुतांश हायस्कूलचे विद्यार्थी आणि मुली आहेत.ही मुले येथे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.हे काज उच्च शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते, जे मुलांना महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेसाठी तयार करते.
'विद्यार्थ्यांनी भरलेल्या खोलीला लक्ष्य करणे लज्जास्पद आहे'
अफगाणिस्तानच्या अमेरिकेच्या प्रभारी कॅरेन डेकर यांनी या हल्ल्याचा निषेध करत ट्विट केले.“परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या खोलीला लक्ष्य करणे लज्जास्पद आहे.सर्व विद्यार्थ्यांना शांततेने आणि कोणत्याही भीतीशिवाय अभ्यास करण्याचा अधिकार आहे. पीडितांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.