शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (16:56 IST)

आश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न

९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून २३ वर्षीय तरुणाने त्यांच्यासोबत लग्न केल्याची आश्चर्यकारक घटना अर्जेटिना येथून समोर आली आहे. या  तरुणाने आता पत्नीच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या पेन्शनसाठीही अर्ज केला आहे. मुख्य म्हणजे तरुण स्वत: कायदा आणि विधी विषयाचा विद्यार्थी असला तरी त्याला पेन्शन नाकारण्यात आली आहे.

मॉरिसिओ ओसोला असे या तरुणाचे नाव असून योलांडा असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. २०१५च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी लग्न केलं होतं. मात्र त्याच्या काही महिन्यातच योलांडा याचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या पश्चात विधुराला मिळणारं पेन्शन मिळावं याकरता ओसोला यांनी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. योलांडा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. तसंच आमचं लग्न व्हावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती, त्यामुळे आम्ही लग्न केलं’ असे म्हणतो.