Widgets Magazine

पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदुंच्या लग्नांना कायदेशीर मंजुरी

Last Modified सोमवार, 20 मार्च 2017 (10:33 IST)
पाकिस्तानात हिंदुंच्या विवाहाशी संबंधित कायद्याला राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी मंजुरी दिली आहे.त्यामुळे आता पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदुंच्या लग्नांना कायदेशीर मंजुरी मिळेल. सिंध प्रांत वगळता संपूर्ण पाकिस्तानात लागू होणारा हा पहिला कायदा आहे. सिंध प्रांताचा स्वतंत्र विवाह कायदा आहे.पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नवाज शरीफ यांच्या सल्ल्यानंतर ‘हिंदू मॅरेज अॅक्ट 2017’ ला राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी मंजुरी दिली आहे.या कायद्याचा उद्देश हिंदु विवाह, त्यांची कुटुंबे, माता आणि मुलांच्या हक्काचे संरक्षण करणे हा आहे. हा कायदा पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदुंच्या लग्नांच्या विधी पूर्ण करण्यात मदत करेल असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :