शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मेक्‍सिको , शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (09:36 IST)

मेक्‍सिको-गटेमालामध्ये शतकातील सर्वात मोठा भूकंप

या शतकातील सर्वात तीव्र भूकंपाच्या धक्‍क्‍याने मेक्‍सिकोमध्ये किमान 33 लोक मरण पावले असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. 8.2 रिश्‍टरच्या या धक्‍क्‍याने काह्‌ी राज्यात मोठ्या प्रमाणावार नुकसान झाल्याचे मेक्‍सिकोचे अध्यक्ष एन्रिक पिआ निएटो यांनी म्हटले आहे. या भूकंपानंतर त्सुनामीच्या शक्‍यतेची धोक्‍याची सूचना देण्यात आली होती. मात्र नंतर त्सुनामीचा धोका नसल्याचे जाहीर करण्यात आले. भूकंपाच्या या तीव्र धक्‍क्‍याने लोकांच्या मनात 1985 सालच्या महाविध्वंसक भूकंपाच्या आठवणीने भीती निर्माण झाली होती. 1985 सालच्या भूकंपाने मेक्‍सिकोचा विध्वंस केला होता. त्यात 10,000 पेक्षाही अधिक लोक मरण पावले होते. स्थानिक वेळेनुसार काल रात्री 11.50 वाजता हा भूकंप झाला. याने मेक्‍सिकोमधील्‌ इमारती हादरल्या आणि लोक जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर धावले. सुमारे एक मिनिट भूकंपाचे हादरे जाणवत होते. 6 कोटी नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याची महिती मेक्‍सिकोच्या अध्यक्षांनी दिली आहे.
 
आतापर्यंत ओऍक्‍झ्का राज्यात 23 लोक मरण पावल्याची माहिती आली असून त्यापैकी 17 जण एका जुशिटन शहरात मरण पावले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. चियापास राज्यात 7 आणि टॅबेस्कोमध्ये दोन जण मरण पावले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुख्य भूकंपाच्या धक्‍क्‍यांनंतर 4.7 ते 5.7 रिश्‍टर तीव्रतेच्या किमान डझनभर धक्‍क्‍याचे नोंद मेक्‍सिकोच्या किनाऱ्यावर जाणवले आहेत.