शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सेंट पीटर्सबर्ग , शनिवार, 3 जून 2017 (11:45 IST)

मोदींनी दिले जगभरातील गुंतवणूकदारांना निमंत्रण

जगभरातील 1 हजार ग्लोबल इन्व्हेस्टर्सचा समावेश असलेल्या रशियातील इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेत गुंतवणूकदारांचे लक्ष भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यवसायाकडे वेधून घेतले. त्यांनी यावेळी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना निमंत्रित केले. फक्त विश्वासा या एका गोष्टीवर संबंध अवलंबून असणारे खूपच कमी देश असून यात भारत-रशिया मैत्रीचा समावेश आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
फोरममध्ये बोलताना मोदींनी भारतीय युवाशक्तीची जाणिवही करुन दिली. भारतातील युवा वैज्ञानिकांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळयान पाठवले. हॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनवायला जेवढा पैसा लागतो, त्यापेक्षाही कमी किंमतीत मंगळावर यान पाठवतात येत असल्याचे सांगत, देशातील युवकांच्या ज्ञानाची कौतुक केले.