Widgets Magazine

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना भारत भेटीचे निमंत्रण

अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात येण्याचे अगत्याचे निमंत्रण दिले. ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने मोदींचे निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच ट्रम्प हे कुटुंबियांसह भारतात येण्याची शक्यता आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील बहुचर्चित भेट अखेर झाली.
ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या बैठकीकडे आणि त्यात होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

पहिल्या भेटीनंतर नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण दिले. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी सहकुटुंब भारतात यावे. तुमच्या स्वागतासाठी मी उत्सुक आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने मोदींचे आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर मोदींनी ट्विटद्वारे त्यांचे आभार मानले. इवांकानेही मोदींचे आभार मानले.


यावर अधिक वाचा :