शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (17:28 IST)

माकडाच्या सेल्फीचा वाद , नरुटाला स्वामित्व हक्कातला २५ टक्के वाटा

नरुटा’ नावाच्या या माकडाचा सेल्फी काही वर्षांपूर्वी तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर  या सेल्फीच्या कॉपीराईटचा वादही गाजला. आता त्या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. तेव्हा यापुढे नरुटाला स्वामित्व हक्कातला २५ टक्के वाटा मिळणार आहे.

याप्रकरणात २०११ मध्ये इंडोनेशियातील जंगलात स्लॅटरयांच्या कॅमेरातून माकडानेच हा फोटो टिपला होता. ‘ नरुटा माकड हे इंडोनेशियातल्या दुर्मिळ प्रजातीचं माकड आहे, स्लॅटर या माकाडाच्या फोटोवर स्वामित्त्वाचे हक्क सांगत असला तरी हे हक्क नरुटाचे आहेत अशी भूमिका पेटाने मांडली आणि त्यांनी अमेरिकेतील न्यायालयात धाव घेतली होती. पण कॉपीराईटचे नियम प्राण्यांना लागू होत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला होता.

‘नरुटा विरुद्ध स्लॅटर’ या गाजलेल्या प्रकरणावर आता तोडगा निघाला आहे. पेटा आणि स्लॅटर या दोघांमध्ये समझोता झाला आहे. या फोटोच्या कमाईतील २५ टक्के रक्कम नरुटाला मिळणार आहे. ही रक्कम त्याच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.