शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

भारताचे मानवरहित चांद्रयान 8 वर्षांनंतर सापडले

भारताने 2008 साली पाठविलेले मानवरहित चांद्रयान 1 अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असल्याची माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने-नासाने दिली आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागपासून 200 किमी अंतरावरून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 29 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयान-1चा इस्रोशी संपर्क तुटला होता. त्यामुळे ते हरवले असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु तब्बल 8 वर्षांनंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-1 चा शोध घेण्यात यश मिळवले आहे.अत्यंत लहान आकाराचे(1.5 घनमीटर आकाराचे), म्हणजे साधारणत: मारुती 800 कारएवढे चांद्रयान-1 शोधणे मोठे कठीण काम होते, असे कॅलिफोर्नियातील राडार शास्त्रज्ञ मरिना ब्रोझोविक यांनी म्हटले आहे. त्यासाठी थोडी डिटेक्‍टिव्हगिरी करावी लागली असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी इंटर प्लानेटरी राडारचा वापर करावा लागला. सामान्यत: इंटर प्लानेटरी राडारचा उपयोग हा पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रह शोधण्यासाठी केला जातो.  चांद्रयान-1 चा भ्रमणकाल हा दोन वर्षांचा अपेक्षित होता, त्यामुळे 9 वर्षांनंतर अंतराळात टिकून आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. अर्थात चांद्रयान-1 काहीही संदेश पाठवू अथवा स्वीकारू शकत नसल्याने आता केवळ “स्पेस जंक’ – आकाशातील कचरा बनले आहे.