मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (20:14 IST)

Covid-19: ओमिक्रॉनचा नवीन आणि अधिक प्राणघातक व्हेरियंट रशियामध्ये आढळला ,बीजिंग मध्ये 166 कोरोना संक्रमित आढळले

covid
रशियामध्ये ओमिक्रॉनचे नवीन सब व्हेरियंट आढळले आहे, जे इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरते. BA.4 हे आतापर्यंत सापडलेल्या ओमिक्रॉन च्या सब व्हेरियंट पेक्षा जास्त धोकादायक आहे. रशियातील आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 
 
रोस्पोट्रेबनाडझोर येथील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर एपिडेमियोलॉजीचे जीनोम संशोधन प्रमुख कामिल खाफेझोव्ह यांच्या मते, दोन राष्ट्रीय प्रयोगशाळांनी Ba.4 सबलाइनच्या विषाणूजन्य जीनोमचा शोध लावला आहे.
 
 चीनची राजधानी बीजिंगमधील एका बारमध्ये आलेल्या 166 लोकांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. बारमध्ये स्फोट झालेल्या या कोविड बॉम्बचा सामना करण्यासाठी, संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या 6,158 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 275 नवीन कोविड बाधित झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 134 लक्षणे नसलेले आणि 141 लक्षणे नसलेले रुग्ण होते. 
 
बीजिंगमधील चाओयांग जिल्ह्यातील सॅनलिटुन भागातील हेवन सुपरमार्केट बारमधील संसर्गाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी, शहर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तीन कोविड चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, 166 पैकी 145 लोकांनी बारला भेट दिली होती, तर उर्वरित लोक त्यांच्या संपर्कात आले होते.