मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 मार्च 2018 (09:26 IST)

जगातील शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा मृत्यू

जगातील एकमेव शेवटच्या पांढ-या नर गेंड्याचा केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात मृत्यू झाला आहे. सुदान असं या गेंड्याचं नाव होतं. सुदान 45 वर्षांचा होता. 2009 साली दोन माद्यांसह त्याला चेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणलं होतं. जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सुदान हा एकमेव नर गेंडा होता. ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

सुदानच्या संरक्षणासाठी तसेच त्याला तस्करांपासून वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. सुदानचं वय वाढलं होतं, तो वृद्ध झाला होता. तसंच त्याच्या पायातली ताकदही हळूहळू कमी होत गेली होती. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी त्याला त्रास होत होता. त्याच्यासोबत दोन माद्या सध्या केनियातील अभयारण्यात आहेत. या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले मात्र त्यांना फारसं यश आलं नाही.