रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (00:50 IST)

आता X-Ray द्वारे कोरोना आहे की नाही हे कळणार, 5 ते 10 मिनिटात निकाल मिळेल

x ray
आतापर्यंत RTPCR, रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे कोरोनाची चाचणी केली जात होती पण आता स्कॉटलंडमधील शास्त्रज्ञांच्या गटाने कोरोना शोधण्यासाठी एक नवीन प्रयोग केल्याचे समजते. आता एक्स-रेद्वारे रुग्णाला कोरोना आहे की नाही हे कळू शकेल. तसेच शास्त्रज्ञांनी ते 98 टक्के अचूक असल्याचे मानले आहे. माहितीनुसार, चाचणीमध्ये व्हायरसची उपस्थिती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो.
 
पाच ते दहा मिनिटांत निकाल मिळेल
संशोधकांनी सांगितले की ही RTPCR चाचणीपेक्षा किती तरी पटीने वेगवान असेल आणि त्याचा निकाल केवळ 5 ते 10 मिनिटांत उपलब्ध होईल. RTPCR चाचणीचा निकाल येण्यासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. संशोधकांप्रमाणे ओमिक्रॉन प्रकारांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती देखील एक्स-रेद्वारे लवकरच शोधली जाईल.
 
हे नवीन तंत्रज्ञान स्कॅनच्या तुलनेत 3 हजाराहून अधिक प्रतिमांच्या डेटाबेससाठी एक्स-रे तंत्रज्ञान वापरते आणि या तंत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रक्रियेची मदत घेतली जाते. शास्त्रज्ञांच्या मते हे 98 टक्के अचूक सिद्ध होईल. तथापि शास्त्रज्ञांनी हे मान्य केले की संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात X-Rayमध्ये कोरोनाची लक्षणे दिसणे खूप कठीण असते.