testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लोकप्रिय 10 ट्विट्समध्ये ओमाबांच्या ट्विटचा समावेश

twitter
यंदा ट्विट करण्यात आलेल्या लोकप्रिय
10 ट्विट्समध्ये बराक ओमाबांच्या ट्विटचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या ट्विटला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. व्हर्जिनियातील शर्लोट्सविले मध्ये भडकलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी ट्विट केले आहे.

बराक ओबामांनी नेल्सन मंडेला यांच्या 1994 साली प्रकाशित झालेल्या आत्मकथेच्या उदाहरणाचा ट्विट करताना लिहले होते ' कोणतीही व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या शरीराचा रंग, त्याची पार्श्वभूमी, धर्म यांच्या आधारे त्याच्याबद्दल द्वेषभावना घेऊन या जगात येत नाही.

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा सर्वाधिक वापर केला आहे. मात्र तरीसुद्धा त्यांचे कोणतेच ट्विट टॉप लिस्टमध्ये नाही. ओबामांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विट्ला सर्वाधिक लाईक्स मिळाले होते. सुमारे 4 करोड 60 लाख लोकांनी लाईक केले आहे.


यावर अधिक वाचा :