Widgets Magazine

ऑस्कर पारितोषिक विजेते हॉलीवुड अभिनेते मार्टिन लॅंडो यांचे निधन

martine lando
लॉस एंजेलिस| Last Modified मंगळवार, 18 जुलै 2017 (10:59 IST)
ऑस्कर पारितोषिक विजेते हॉलीवुड अभिनेते मार्टिन लॅंडो यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. लॉस ऐंजेलीस मधील एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . मिशन इंम्पॉसिबल या टि.व्ही मालिकेसाठी त्यांना “सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला होता.
मर्टिन यांचा जन्म 1928 साली न्यूयॉर्क मधील बुक्‍लिन शहरात झाला. त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात त्यांनी 17 व्या वर्षी वृत्तपत्रात कार्टूनिस्ट म्हणून केली होती. पाच वर्षांनंतर त्यांनी अभिनयासाठी शिक्षण सोडले. मार्टिन लॅंडो यांनी 200 पेक्षा अधिक चित्रपट आणि टि.व्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांना 1994 मध्ये “एड वुड ‘ साठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


यावर अधिक वाचा :