शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (16:29 IST)

मुंबई-कराची विमान सेवा पीआयएकडून स्थगित

येत्या 11 मे पासून  पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स अर्थात पीआयएने मुंबई-कराची विमान सेवा  स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही पाकिस्तानची राष्ट्रीय विमान सेवा असून त्याद्वारे आठवड्यातून एकदा कराची-मुंबई विमान सेवा कार्यन्वित आहे. दर मंगळवारी ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान एअरलाइन्सने घेतला आहे. ही विमानसेवा अचानक स्थगित करण्याचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र पीआयएच्या अधिकृत प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने ही सेवा सुुरू ठेवणे व्यवस्थापनाला आर्थिक दृट्या सोयीचे नाही. मात्र तेच एकमेव कारण नसावे असे दिसते. यामागे भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणावही कारणीभूत आहे. सध्या कराची आणि लाहोरहून दिल्लीसाठी असलेली विमानसेवा मात्र पीआयएने सुरुच ठेवलेली आहे.