सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर शोधली लस, प्रयोग सुरू

करोनासारखा रोग जगातून पळवून कसा लावायचा हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. मात्र एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरससाठी लस तयार केली आहे. येथील १८ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यासही सुरुवात करण्यात आली असून इंग्लंडच्या औषध प्राधिकरणाने ChAdOx1 SoV-19 या नावाचे औषध तयार करण्यासही परवानगी दिलेली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक एड्रियन हिल यांनी सांगितलं की, ऑक्सफर्डच्या टीमला लवकरच कोरोनावर उपाय म्हणून लस शोधण्यात यश मिळणार आहे. त्यादिशेने आमचे प्रयत्नही सुरू आहेत. २०१४ मध्ये इबोलाच्या वेळेस जी परिस्थिती होती, त्यापेक्षाही आताची परिस्थिती फार गंभीर आहे, मात्र तरीही यावर आपण मात करू शकू.