शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By

आता ट्विटरवर फक्त Tweet नाही तर Fleet करता येणार

ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून हे फेसबुक, इन्स्टाग्रामच्या फीचरसारखे आहे.
 
यामुळे आता ट्विटरवर Fleet नावाच्या आणखी एका नवीन फीचरची चाचणी करण्यात येत आहे. या नवीन फीचरच्या मदतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं तर ते एका वेगळ्या टाईमलाईनवर दिसेल. तसेच 24 तासांनंतर हे आपोपाप गायब होईल. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक स्टेट्स यासारखे हे नवे फीचर असणार आहेत. 
 
ट्विटर ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर यांनी एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता युजर्संना दुसऱ्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी आणि कमी वेळात जास्त कंट्रोल करणारं फीचर देण्यात आले आहे. ट्वीट हे सार्वजनिक असतं. ते सर्वांना कायम दिसतं. त्यामुळे अनेकजण ट्विटरचा वापर जास्त करत नाहीत. सध्या हे फीचर ब्राझीलमध्ये सुरू करण्यात येत आहे.' ट्विटरने या नव्या फीचरला Fleet असं नाव दिलं आहे. त्यामुळे युजर्स आता ट्विट सोबतच Fleet देखील करू शकतात. 
 
ट्विटरवर युजर्सना Fleet करता यावं यासाठी एक नवं बटण देण्यात आलं आहे. ज्यावर क्लिक करून Fleet करता येतं. Fleet अंतर्गत युजर्संना 280 टेक्स्ट कॅरेक्टर अ‍ॅड करता येईल. यात फोटो किंवा जीफ फाइल आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट करता येईल. ज्या अकाउंट्सला फॉलो केले आहे. त्यांचे फ्लिट वरच्या बाजुच्या टॅबमध्ये दिसेल. कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येऊ शकणार नाही. इमोजीसाठी फ्लिटला रिस्पॉन्ड करू शकता येईल.