रविवार, 6 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (10:12 IST)

Pakistan: दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये चकमक, दोन जवान शहीद

pakistan
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अशांत वायव्य आदिवासी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचा एक मेजर आणि एक सैनिक ठार झाला. खैबर पख्तुनख्वा प्रांतात बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या अतिरेकी गटाने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात नऊ सैनिक ठार झाल्यानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली आहे. 
 
एका गुप्त माहितीनंतर लष्कराचे जवान तेथे शोधासाठी पोहोचले तेव्हा शहामध्ये हा प्रकार घडला. या घटनेबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला, ज्यामुळे दोन गटांमध्ये गोळीबार झाला. या चकमकीत लष्कराचा एक मेजर आणि एक जवान शहीद झाला. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला तर दुसरा जखमी झाला.गुरुवारी लष्करावर केलेल्या हल्ल्यात नऊ सैनिक ठार झाले, तर 20 जण जखमी झाले. 
 




Edited by - Priya Dixit