testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाकची प्रतिमा ’26/11च्या हल्ल्यामुळे मलीन झाली’

वॉशिंग्टन| Last Modified बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:23 IST)
भारतावर पाककडून करण्यात आलेल्या 26/11 च्या
हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाली असल्याचे पाकिस्तान सांगत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाज मोहम्मद खान यांनी सांगितले की ,या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या काश्मिर मोहिमेला खूप मोठे नुकसान झाले असून,जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलीन झाली आहे.26 सप्टेंबर 2008 रोजी पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गे घुसून दहशतवादी हल्ला केला. यात परदेशी नागरिकांसह 166 जणांचा बळी गेला होता.
रियाज मोहम्मद खान यांनी मुंबई हल्ल्यांवरील हे
वक्तव्य वॉशिंग्टन येथे पाकिस्तानच्या दूतावासात केले आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानचे इतर महत्वाचे मुत्सद्दी अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित होते.
खान यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताना आपल्या देशाची इमेज जगभरात मलीन झाली असे म्हटले आहे. यासोबतच या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगात जी इमेज तयार झाली त्यामुळे काश्मिर आणि इतर मोहिमांना मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई कधीच करता येणार नाही असेही ते म्हणाले रियाज मोहम्मद खान हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव असून सध्या ते जॉर्जटाउन विद्यापीठात प्राध्यापक आहेत.


यावर अधिक वाचा :