testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाकमध्ये सुफी दर्ग्यात स्फोट, 100 ठार

Pak Sufi shrine
कराची- पाकिस्तानमधील सेहवानमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लाल शहबाज कलंदरमधील सुफी दर्ग्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.
दर्ग्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या भागात आत्मघाती हल्ला करण्यात आल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्फोटातील जखमींना मेडिकल संकुल जमशोरा आणि उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी संघटना इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दक्षिण पाकिस्तानमधील लाल शहबाज कलंदरमधील सुफी दर्ग्यात स्फोट झाला.


यावर अधिक वाचा :