पाकिस्तान सैर भैर म्हणाला आम्ही आता आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय नेऊ
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता हादरून गेला आहे. काय करावे आणि काय वक्तव्य करावे हे पाकिस्तानला कळून येत नाही, त्यामुळे आता पाकिस्तानची चांगलीच गोची झाली आहे.
आता भारतीय वायुसेनेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पहाटे ३.३० वाजता भारतीय वायुसेनेच्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत दहशतवाद्यांचे तळे पूर्णपणे उद्धवस्त केली आहेत. सोबतच २०० ते ३०० दहशतवादी यामध्ये ठार झाले. या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे दोन भाऊ आणि एक मेहुणा मारले गेले आहेत. हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुरता गोंधळून गेला आहे, आता आंतरराष्ट्रीय तळावर जाणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हणत आहेत.
शाह मोम्मद कुरेशी म्हणाला की वातावरण योग्य नाही, योग्य वेळ आणि तसं वातावरण निर्माण झाल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय नेऊ असे कुरेशी म्हणाले. दरम्यान हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड हालाचालींना सुरुवात झाली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे तातडीची बैठक बोलावली होती. आता पाकिस्तान या गोष्टीचा कांगावा करत असून भारतावर आरोप करत हा प्रश्न आता मोठा करणार अशी धमकी देत आहे. तर या हल्ल्यामुळे पाकिस्तानची स्वतःच्या देशा तील लोक नाचक्की करत आहेत आणि त्याच्या लष्कराला शिव्या देत आहेत.