रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (09:39 IST)

पाकिस्तान कडे जाणारे पाणी अडवायला अमित शहा नदीत बसणार का - राज ठाकरे

कोल्हापूर  येथे राज ठाकरे यांचा दौरा होता, सरकार पाकिस्तानात जाणारं पाणी अडवून, पाकची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्री आणि नेत्यांनी म्हटले असताना, या वक्तव्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का?” पाणी अडवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली, राज पुढे म्हणाले की नदीमध्ये बंधारा म्हणून अमित शाहांना बसवणार का? अमित शाहा जारे जोप, अडेल पाणी आपोआप.”, असे म्हणत राज ठाकरे पुढे म्हणाले,”पाकिस्तानचं पाणी तोडणार. पाकिस्तानचं पाणी तोडयला, ते पाणी नळातून देता का? इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट नावाची काही गोष्ट असते की नाही? दोन किंवा तीन देशातील जाणारं पाणी एक देश थांबवू शकतो का?”पुलवामा हल्ल्यातील 40 जवान शहीद झाले, हे जवान राजकीय बळी आहेत, असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला आहे.
 
अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली ना, तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. हे नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलंय, हे बाहेर येईल.”, असे म्हणत पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज पुढे म्हणाले की निवडणुकीच्या जश्या जवळ येतील किंवा मध्यात अशीच कोणतीतरी घटना घडवली जाणार आणि व तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे त्या गोष्टीकडे वळवलं जाईल. चार वर्षातील भ्रष्टाचार वगैरे तुम्ही विसरून जाणार आपली स्मरणशक्ती कमी असते, त्यामुळे त्या गोष्टी घालवायच्या. हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान असे चित्र निर्माण केलं जाईल.”, अशी टीका त्यांनी केली आहे.