सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (11:20 IST)

भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट

ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला आहे. 
 
लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रुची घनश्याम यांनी यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांना फोन केला व संविधानाच्या प्रती जाळण्याच्या या कटाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय उच्चायुक्तांनी गृह सचिव प्रिती पटेल यांच्याबरोबर भारत-ब्रिटन संबंध अधिक बळकट कसे होतील याबद्दल फोनवरुन चर्चा केली. प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबद्दलची चिंता त्यांनी गृह सचिवांच्या कानावर घातली अशी माहिती उच्चायुक्तालयाने टि्वट करुन दिली आहे.
 
भारतीय वंशाच्या नागरिकांनी युकेच्या यंत्रणांशी पत्रव्यवहार करुन या संभाव्य आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.