testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोंबडी वाजवते पियानो

hen
अमेरिकेतील रिआलिटी टॅलेंट शोमध्ये एका कोंबडीने पियानो वाजवून सर्वांना चकित केले. तसेही टॅलेंट शोमध्ये उपस्थितांना आश्चर्याचे अनेक धक्के बसत असतात. या शोमध्ये असे काही घडत असते की ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. तसाच हा शो होता.

त्यात टॅलेंट शोमध्ये दोन महिला एका कोंबडीला घेऊन आल्या होत्या. ही कोंबडी पियानो वाजवेल असे त्या महिलांनी सांगितल्यावर सगळ्यांनाच हसू आवरले नाही. शोच्या पंचांनाही प्रश्न पडला की, असे कसे होऊ शकते? कोंबडी पियानो कसे वाजवणार? नंतर असे काही घडले की पंचांना सन्मान म्हणून उठून उभे राहावे लागले.

कोंबडीने आपल्या चोचीने पियानो वाजवायला सुरुवात केली. ते पाहून उपस्थितांना अचंबित व्हावे लागले. त्यांचा त्यांच्याच डोळ्यांवर व कानांवर विश्वास बसेना. या कोंबडीचे नाव जोकगू होते. अगदी सुरुवातीला कोंबडी पियानोजवळ गेल्यावर तिला संगीत वाजविण्यात काही गोडी असल्याचे दिसले नाही. नंतर तिने अचानक पियानोचे बटन दाबून संगीत सुरू केले. कोंबडी पियानो वाजवते हे पाहून उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.


यावर अधिक वाचा :