1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (23:19 IST)

Peru Protest: पेट्रोलच्या किमतीवर आता पेरू मध्ये संतापाची लाट, राष्ट्रपतींनी आणिबाणी जाहीर केली

श्रीलंका प्रमाणे आता पेरूमध्ये पेट्रोलच्या दरवाढीमुळे संताप व्यक्त होत असून, लोकांचा निषेध होत आहे. अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि तोडफोड झाल्याच्या बातम्या आल्या. तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करत तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे. यानंतर राष्ट्रपतींनी राजधानी लिमा आणि कालाओमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
 
जगभरात इंधन, गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे, ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, पेरूमध्येही त्याचा परिणाम दिसून येत असून लोक संतापाने रस्त्यावर उतरले आहेत.
 
पेरूचे अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनीही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कर्फ्यूची घोषणा केली, काही मूलभूत अधिकार देखील काही काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. 
 
लोकांचा कोलाहल वाढल्याने सरकारने राजधानी लिमामध्ये आणीबाणी लागू केली आहे, लिमामध्ये जोरदार निदर्शने झाली आहेत. 
 
वाढत्या इंधन आणि खतांच्या किमतींविरोधातील निदर्शने कमी करण्याच्या प्रयत्नात लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. 
 
सोमवारी, निदर्शकांनी टोल बूथ जाळले आणि दक्षिणेकडील इका शहराजवळ पोलिसांशी चकमक झाली. शेतकरी आणि ट्रक चालकांनी लिमाकडे जाणारे काही मुख्य महामार्ग रोखले, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत अचानक वाढ झाली.