मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (11:07 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा व्दीपक्षीय संबंधावर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींचे तोंडभरून कौतूक केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती असल्याचेही यावेळी ट्रम्प यांनी म्हटले.
नरेंद्र मोदींचे कौतूक करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध गायक, अभिनेता एलविस प्रेस्लि यांच्यासोबत केली. तसेच भारतात सुरुवातीला अशांततेचे वातावरण होते. मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली म्हणून त्यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असाच केला पाहिजे. याचे कारण त्यांनी भारतातील परिस्थिती एखाद्या वडिलधाऱ्या माणसासारखीच सांभाळली. आम्ही त्यांना फादर ऑफ इंडिया असेच म्हणू असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मला असे वाटते की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे एकमेकांची भेट घेतील. त्यांच्या चर्चेतून सकारात्मक आणि चांगले काहीतरी समोर येईल अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.
न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील आयएसआय आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा यावर योग्य तो उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी योजतील असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे ह्युस्टनमध्ये आल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच ट्रम्प हे माझेच मित्र नाहीत तर ते भारताचेही चांगले मित्र आहेत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.