मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (07:45 IST)

ओमान येथेजत शहरातील अभियंत्यासह तिघे समुद्रात बुडाले

महाराष्ट्र राज्यातील सांगली  जत शहरातील सुप्रसिद्ध वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू व त्यांची दोन मुलं ओमान देशातील एका समुद्र किनारी फिरायला गेले असता लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शशिकांत उर्फ विजयकुमार म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगीश्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस अशी समुद्रात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. रविवारी दि.10 जुलै रोजी ही घटना घडली आहे. मात्र, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला असत, त्यांनी बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.
 
शहरातील सुप्रसिद्ध वकील राजकुमार म्हमाणे यांचे मोठे बंधू शशिकांत म्हमाणे हे दुबई येथील इंटरनॅशनल कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत आहेत. याठिकाणी शशिकांत त्यांची पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) हे सर्व राहण्यास आहेत. रविवारी ईदची सुट्टी मिळाल्याने म्हमाणे कुटुंबासह इतर मित्र मंडळी ओमान देशात फॅमिलीसह फिरायला गेले होते.
 
दरम्यान, येथील एका समुद्र किनारी लाटांचा आनंद घेत असताना मागून जोराची लाट आल्यानंतर यामध्ये नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हा वाहून जात असताना शशिकांत हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले असताना ते ही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी तेथील स्थानिक पथकामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे वृत सांगण्यात आले आहे.