सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

SSC-HSC Supplementary Exam Result दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

maharashtra board result 2023
SSC-HSC Supplementary Exam Result 2023 इयत्ता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल (Class X, XII Suppelemantary Exam Result) आज दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन प्रणाली द्वारे जाहीर होणार आहे. 
 
ही परीक्षा ऑगस्ट महिन्यातच पार पडली होती. आपण याचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर पाहू शकता. येथून निकाल डाऊनलोडही करु शकता. तर जाणून घ्या निकाल कसा पाहायचा- 
 
परीक्षेचा निकाल www.mahresult.in या संकेतस्थळावर बघता येईल.
 
गुणपडताळणी करायची असल्यास किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवायची असल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-hsc.ac.in निकाल पाहता येणार आहे. 
 
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती.