शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:51 IST)

2 मैत्रीणींना हवा एकच नवरा

Love
मलेशियातील प्रेम आणि मैत्रीचे एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे, ज्याची सध्या फेसबुकवर खूप चर्चा होत आहे. प्रत्यक्षात येथे राहणार्‍या दोघी मैत्रिणी त्यांच्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत. आता जर एखाद्या मुलीला लग्न करायचे असेल तर तिला मुलगा सापडेल, पण या दोघी मैत्रिणींना एकाच मुलाशी लग्न करायचे आहे, दोन वेगवेगळ्या मुलांशी नाही आणि त्यासाठी दोघींनी फेसबुकवर जाहिरातही केली आहे.
 
 व्हायरल सेन्सी मलेशिया नावाच्या फेसबुक पेजने दोन्ही मैत्रिणींच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, दोन्ही मैत्रिणी अशा मुलाच्या शोधात आहेत जो या दोघांशी लग्न करू शकेल. कारण दोघेही चांगले मित्र आहेत आणि त्यांना एकमेकांची सौत बनण्यास कोणतीही अडचण नाही. पोस्टमध्ये दोघांच्या निवडीबद्दल असेही सांगण्यात आले आहे की, दोघांनाही असा मुलगा हवा आहे जो त्यांना जसेच्या तसे स्वीकारेल.
 
 याशिवाय या फेसबुक पोस्टमध्ये दोन्ही मैत्रिणींबाबत  डिटेल्स देखील देण्यात आल्या आहे. एक महिला ३१ वर्षांची असून ती सिंगल मदर आहे. त्याच वेळी दुसरी  ही 27 वर्षीय महिला असून ती स्वतःचा लाँड्री व्यवसाय चालवते. दोघांची ही पोस्ट फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया देत आहेत. या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी शेअरही केले आहेत.