मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

'टेस्ला रोडस्टर' कार अंतराळात भरकटली

सर्व जगात चर्चा आहे   'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स. या  कारला अंतराळात पाठवले होते. मात्र आता पुन्हा ती चर्चेत आली आहे.उद्योगपती  इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीने  स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती फेरी घालण्यासाठी पाठविलेली 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे. त्यामुळे ती आता पुन्हा मार्गावर येईल का यावर प्रश्न निर्माण झाले आहे. का झाले असे , कशामुळे कार भरकटली रस्ता?
 
या कारच्या मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट्स कार व त्यातील  डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जात स्थिर व्हायचे  होते. मात्र पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी अंतराळात जात आहे. त्यामुळे  ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि राखेने भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे. रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पृथ्वीवर थोड्या प्रमाणत प्रयत्न केले जात आहेत.