रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)

विध्वंसक अण्वस्त्र किम जोंग उन यांच्या देशानं तयार केलं

उत्तर कोरियाचे (North Korea) सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबतचं एक दुर्मीळ दृश्य नुकतंच जगाने पाहिलं. मिलिट्री परेडमध्ये आपल्या देशातील लोकांची जाहीरपणे माफी मागताना दिसले. पण आता या VIDEO (Kim Jong Un video) सोबतच आणखी एक विषय चर्चेत आला आहे. पहिल्यांदाच साऱ्या जगाचे लक्ष गेलं त्याकडे गेलं आहे. हा विषय आहे उत्तर कोरियाने तयार केलेलं ह्वासोंग-16 आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल.  (Hwasong-16 intercontinental ballistic missile) हे मिसाईल जगातील सगळ्यात मोठं बॅलिस्टिक मिसाईल आहे असं सांगितलं जात आहे. क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क शहर बेचिराख करण्याची ताकद या अण्वस्त्रधारी मिसाईलमध्ये आहे.
 
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातली सगळ्यात मोठं मोबाईल न्यूक्लिअर मिसाईल (Nuclear Missile) आहे. जे काही क्षणांत अमेरिकेच्या मोठ्या शहरांना बेचिराख करू शकतं. तसंच हे मिसाईल एकाच हल्ल्यात लाखो लोकांना मरणाच्या दारात नेऊ शकतं.
 
NUKEMAP च्या माहितीनुसार जर किम जोंग उन यांनी हे मिसाईल वापरून न्यूयॉर्क शहरावर निशाणा साधला तर काही क्षणांतच 64 लाख लोक मारले जातील किंवा पुढच्या काही आठवड्यांमध्ये तेवढेच लोक किरणोत्सर्गाने (Radiation) होणाऱ्या आजारांना बळी पडतील.
 
हे मिसाईलला नष्ट करणं कठीण
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या 'मॉन्स्टर' आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) चा शोध घेणं आणि नष्ट करणं खूपच कठीण जाणार आहे. तसंच मिसाईलविरोधी प्रतिकार रोखण्यासाठी डेकॉय हल्ला करण्यास सुद्धा हे मिसाईल सक्षम आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातलं सर्वांत मोठं रोड-मोबाईल, लिक्विड फ्युएल मिसाईल आहे. 
 
सत्ताधारी कामगार पक्षाच्या 75 व्या स्थापनादिनानिमित्त राजधानी प्योंगयांगमध्ये आयोजित संचलनात किम जोंग उनसमोर ह्वासोंग-16 बॅलिस्टिक मिसाईल आणण्यात आलं. हे मिसाईल इतकं मोठं आहे की त्याला 11 अॅक्सेलच्या वाहनावर ठेऊन या परेडमध्ये आणण्यात आलं.