1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 10 मार्च 2022 (19:17 IST)

डुक्कराचे हृदय लावलेल्या माणसाचा मृत्यू ,दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली

The man with the heart of the pig died
सुमारे दोन महिन्यांपूर्वी, एक विलक्षण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेत अमेरिकेतील एका माणसाला डुक्कराचे हृद्य लावण्यात आले होते. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या मेरीलँड रुग्णालयाने दिली आहे. डेव्हिड बेनेट(57) असे या मयतचे नाव आहे. 
 
डेव्हिड यांच्या मृत्यूचे कारण अद्याप डॉक्टरांनी दिलेले नाही. काही दिवसांपूर्वी डेव्हिड यांची प्रकृती ढासळू लागली. बेनेटवर 7 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया कितपत यशस्वी होईल हे बेनेट यांना माहित होते. 
 
सुरुवातीला, बेनेटचे शरीर डुकराच्या हृदयासह काम करत होते आणि मेरीलँड हॉस्पिटलने वेळोवेळी अद्यतनित केले की बेनेट हळूहळू बरे होत आहे. गेल्या महिन्यात, हॉस्पिटलने त्याच्या फिजिकल थेरपिस्टसोबत काम करताना त्याच्या हॉस्पिटलच्या बेडवरून फुटबॉल मॅच पाहत असल्याचा व्हिडिओ जारी केला. आता एकाएकी त्यांच्या मृत्यूचे समजले.