गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (15:41 IST)

तुम्ही सुंदर युवती आहात मग तुम्ही वाहतूक पोलीस नक्की

हो हे खर आहे, जर तुम्ही मुलगी असला आणि सुंदर असाल तर मग तुमची सरकारी वाहतूक पोलीस म्हणून नोकरी वाट पाहत आहे.तर सोबत उत्तम पगार सुद्धा. मात्र हे घडते उत्तर कोरियात. खुशमिजास आणि मनमानी मुजोर  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन महिला वाहतूक पोलिसांवर फिदा झाला आहे. त्याने वाहतूक पोलिसांसाठी खास नवे धोरण तयार केले आहे. या धोरणातंर्गत किम जोंग वाहतूक पोलिस शाखेत सध्या तरी  फक्त महिलांची भरती करतो आहे. यामध्ये त्याने नोकरी मिळवण्यासाठी किमच्या दोनच अटी आहेत सौदर्य आणि हॉटनेस असावा असे त्यांने पत्रक काढले आहे . किम जोंग स्वत: मुलाखती घेऊन वाहतूक महिला पोलिसांची निवड करतो. उत्तरकोरियाच्या वाहतूक महिला पोलिसांसाठी खास  वेबसाईट असून त्यावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. त्यामुळे तेथील अनेक सुंदर महिला वाहतूक पोलीस बनत आहेत.